रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे. या योजनेची गरज का पडली? ...रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.

या योजनेची गरज का पडली?

काळा पैसा, बनावट नोटा आण दहशतवाद्यांना पुरवला जाणारा पैसा रोखण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्याची गरज पडली. बनावट नोटा चलनात मिसळल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. या नोटा हद्दपार करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं.

काय आहे योजना?

चलनातून 500, 1000 च्या नोटा रद्दबातल करण्यात आल्या आहेत. कसल्याही व्यवहारासाठी या नोटांचा वापर करता येणार नाही. केवळ 11 नोव्हेंबरपर्यंत रुग्णालये, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, विमानतळ या ठिकाणी या नोटांचा वापर करता येणार आहे. तुमच्याकडील 500, 1000 च्या नोटा आरबीआयचे देशातील 19 कार्यालये, कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येणार आहेत.

नोटांच्या बदल्यात काय मिळणार?

जमा केलेल्या रक्कमेच्या मोबदल्यात तुम्हाला सर्व रक्कम जशास तशी मिळणार आहे. यामध्ये कुणालाही तोटा होणार नाही.

जुन्या नोटांच्या बदल्यात पैसे लगेच मिळणार का?

उ. नाही, प्रति व्यक्ती केवळ 4 हजार रुपये मिळतील. बाकी रक्कम तुमच्या खात्यात जमा राहिल.

सर्व नोटा जमा केल्या तरी तातडीने बदलून का मिळणार नाहीत?

या योजनेत अशी सुविधा देण्यात आलेली नाही. कारण 100 च्या नोटांचा तुटवडा निर्माण होईल म्हणून टप्प्याटप्प्याने नोटा बदलून मिळतील.

4 हजार रुपये माझ्या गरजेसाठी कमी आहेत, मग काय करु?

इतर गरजांसाठी तुम्ही मोबाईल बँकिंग, फंड ट्रान्सफर, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांचा वापर करु शकता.

माझं कोणत्याही बँकेत खातं नसेल तर काय करायचं?

कागदपत्र जमा करुन कोणत्याही बँकेत खाते उघडू शकता.

माझ्याकडे फक्त जनधन योजनेंतर्गत उघडलेलं खातं आहे, तर काय करावं?

जनधन योजनेंतर्गत खाते असणाऱ्या खातेधारकांना जुन्या नोटा जमा करुन त्याबदल्यात बदल्यात नव्या नोटा मिळतील.

माझ्याकडील नोटा कुठे-कुठे बदलून मिळतील?

तुमच्याकडच्या 500, 1000 च्या नोटा रिझर्व्ह बँकेची सर्व कार्यालये, बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळतील.

मला फक्त माझं खातं असलेल्या बँकेतच जावं लागेल का?

4 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी आवश्यक कागदपत्र घेऊन तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊ शकता. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करण्यासाठी तुमचं खातं असलेल्या बँकेतच जावं लागेल.

जर तुमचं कोणत्याच बँकेत खातं नसेल तर आरबीआयने जारी केलेला नोटा बदली फॉर्म भरुन सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड अशा आवश्यक कागदपत्रांसह बँकेत तुमची माहिती द्यावी लागेल. मग तिथे तुम्हाला नोटा बदलून मिळतील.

मी माझ्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकतो का?

होय

माझ्या बँकेशिवाय कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळतील का?

होय. आवश्यक कागदपत्रांसह 4000 रुपयांपर्यंतची रक्कम कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता.

माझं बँकेत खातं नाही. मात्र माझ्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या खात्यामार्फत पैसे बदलून घेऊ शकतो का?

जर तुम्हाला तुमचे नातेवाईक किंवा मित्र लेखी परवानगी देत असतील तर तुम्ही त्यांच्या खात्यामार्फत नोटा बदलून घेऊ शकता.

मला स्वतःलाच बँकेत जावं लागेल, की इतर कोणाला पाठवलं तर चालेल?

जर तुम्ही स्वतः बँकेत गेलात तर उत्तमच आहे. मात्र तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या प्रतिनिधीला परवानगी पत्र देऊन पाठवू शकता. प्रतिनिधीजवळ तुमचं एखादं ओळखपत्र असणंही गरजेचं आहे.

मी एटीएममधून पैसे काढू शकतो का?

यासाठी काही वेळ लागणार आहे. बँकांनी एटीएममध्ये 100 च्या नोटा भरल्यानंतर तुम्हाला पैसे काढता येतील. 18 नोव्हेंबरपर्यंत दररोज केवळ 2 हजार रुपये एटीएममधून काढता येतील. 19 नोव्हेंबर नंतर ही मर्यादा 4 हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल.

मी चेकने पैसे काढू शकतो का?

चेकने पैसे काढता येतील. चेकने पैसे काढण्याची कमाल मर्यादा 10 हजार दररोज आणि आठवड्याला 20 हजार रुपये एवढीच आहे. म्हणजे तुम्ही आठवड्यातून दोनदाच पैसे काढू शकता. 24 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा लागू आहे.

एटीएम, कॅश डिपॉझीट मशिन यांच्यामार्फत पैसे जमा करु शकतो का?

होय

मी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन फंड ट्रान्सफर या सुविधांचा वापर करु शकतो का?

होय

माझ्याकडच्या नोटा कधीपर्यंत बदलून घेऊ शकतो?

ही योजना 30 डिंसेबरला बंद होणार आहे. त्यामुळे दिलेल्या कालावधीतच नोटा जमा कराव्या लागतील. मात्र या कालावधीत ज्यांना नोटा जमा करणं शक्य नाही, त्यांनाही पुन्हा जुन्या नोटा बदलून घेण्याची संधी मिळणार आहे. आरबीआयच्या ठराविक कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्रासह या नोटा जमा करता येतील. या प्रतिज्ञापत्रात तुम्ही तुमच्याकडील पैशाचा स्रोत सांगणं गरजेचं आहे.

मी सध्या भारताबाहेर आहे, तर काय करावं?

तुम्ही तुमच्या कोणत्याही नातेवाईकामार्फत पैसे जमा करु शकता. त्यासाठी नातेवाईकाकडे तुमचा अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड यापैकी कोणतेही अधिकृत ओळखपत्र जवळ असणं गरजेचं आहे.

मी अनिवासी भारतीय आहे, माझं बँक खातंही एनआरओ असेल तर काय पर्याय आहे?

तुम्ही तुमच्या याच खात्यात पैसे जमा करु शकता

मी परदेशी पर्यटक आहे, माझ्याकडच्या नोटांचं काय करावं?

एअरपोर्ट एक्स्चेंज काऊंटवर जाऊन तुम्ही तुमच्या नोटा बदलून घेऊ शकता.

मला (रुग्णालय, औषध खरेदी, प्रवास) यांसाठी पैशांची गरज असेल तर काय करावं?

रेल्वे स्थानक, रुग्णालये, बस स्थानक, एअरपोर्ट अशा ठिकाणी 11 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र औषध खरेदीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी गरजेची आहे.

यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?

आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड अशी कागदपत्र जवळ असणं गरजेचं आहे.

या योजनेविषयी अधिक माहिती मला कुठे मिळेल?

तुम्ही www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

मला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मी काय करावं?

तुम्ही कधीही आरबीआयच्या publicquery@rbi.org.in या ईमेल वर तुमची समस्या पाठवू शकता. किंवा 022 22602201/022 22602944 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

READ | Technology in New Notes of ₹500 and ₹2000
Name

Chanakya Niti,1,developing india,4,Documentary,1,india,17,india map,1,india news,2,indian map,1,Indian Railway,1,mera desh badal raha hai aage badh raha hai,2,Monoj Joshi,1,monuments,11,monuments of india,11,narendra modi,2,Patriotic Songs,1,Qutub Minar,1,Railway Security,1,RTS,1,Speech,4,States,17,ujwal bharat,1,
ltr
item
India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.
https://1.bp.blogspot.com/-t_DXhDjYcns/WCRb_8j2iAI/AAAAAAAAEAQ/4KHcwcy_8vUcIEPDAsM8ifyyLb4ZVrJUACLcB/s1600/CURRENCY.jpg
https://1.bp.blogspot.com/-t_DXhDjYcns/WCRb_8j2iAI/AAAAAAAAEAQ/4KHcwcy_8vUcIEPDAsM8ifyyLb4ZVrJUACLcB/s72-c/CURRENCY.jpg
India
http://india.snaxzer.com/2016/11/blog-post.html
http://india.snaxzer.com/
http://india.snaxzer.com/
http://india.snaxzer.com/2016/11/blog-post.html
true
16981569123713943
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy